बार्शीत केंद्र सरकारच्या विरोधात चूल पेटवून महागाईचा व गॅस दरवाढीचा निषेध

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : युवासेना व युवतीसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरूद्ध व वाढत्या महागाईच्या विरोधात बार्शी तहसील कार्यालय समोर चुल पेटवून भाकरी भाजुन व दाळ शिजवून, केंद्र सरकारचा निषेध करून अनोखे आंदोलन करण्यात आले. सातत्याने होतं असलेल्या महागाई, गँस इंधन दरवाढी मुळे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचेजिवन जगणं मुश्किल झाले आहे. या परस्थितीत सरकार ने वाढत्या गॅस पेट्रोल खाद्यतेल डाळी इत्यादींच्या दराबाबत विचार करणे गरजेचे आहे. गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिन दलित जनतेच्या जगण्याकडे गांभीर्याने सरकारने पहावे सततची होत असलेली दरवाढ व महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झालं असून याची वेळीच दखल घ्या अन्यथा हीच जनता तुम्हाला सरकारच्या बाहेर काढण्याची दखल घेईल असा इशारा यावेळी उपस्थित युवती सेनेच्या एडवोकेट उषा पवार व रजनी पाटील यांनी सरकारला दिला.यावेळी उपस्थित युवासेना सहसचिव अॅड उषा पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत रामगुडे, महिला तालुका प्रमुख मंगलताई पाटील, युवासेना बार्शी विधानसभा प्रमुख अजिंक्य बारंगुळे, युवतीसेना तालुका प्रमुख रजनी पाटील, युवासेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, विद्यार्थीसेना तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, दिपक जाधव, नवनाथ चोबे, अजय बनसोडे, गणेश लंगोटे, आनंद काशीद, शोएब सय्यद, विकास बारबोलेआदि शिवसैनिक उपस्थित होते..यावेळी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या