महामानव बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश लंगोटे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाब शेख तर प्रमुख उपस्थिती रणजित चौधरी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथिमेला पुष्पहार गणेश लंगोटे , गुलाब शेख यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, रणजीत चौधरी , किरण खुरंगळे , गणेश लंगोटे , गुलाब शेख , विश्वनाथ बारवकर,राजेंद्र भोसले, इत्यादि मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे अध्यक्ष विविध मान्यवारांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर कार्यक्रमाची प्रस्तावना , आभारप्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी केले.