सिंहगड प्रतिकृती देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी, युवा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात या वर्षी किल्ले सिंहगड प्रतिकृती देखावा उभारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी बार्शीकरानी मोठी गर्दी केली आहे. शिवजनोमत्सवा निमित्त विविध उपक्रम राबवणाऱ्या युवा प्रतिष्ठानने या वर्षी अष्टभुजा देवीचा देखावा व किल्ले सिंहगड प्रतिकृती देखावा उभारला आहे. हा किल्ला इतका हुबेहूब उभारला आहे की पाहणाऱ्याला खरच सिंहगडा वर गेल्याचा अनुभव येत आहे. याच बरोबर युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर व शिवप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 130 रक्तदात्यांनी रक्तदान करत या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.शिवजन्मोत्सवासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अँड.सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंद गरड, शिवाजी हाके, कल्याण चव्हाण, शशिकांत डोंगळे, सदानंद धुमाळ, रोहिग डोंगळे, कपील सरवदे, ज्ञानेश्वर वायकुळे, वैभव ढगे, स्वानंद धुमाळ, मनू चव्हाण, दीपक नवले, अक्षय चव्हाण, आशु डोंबे, ऋषी डोंगळे, मोहित मस्तूद, सुहास वायकुळे, निलेश वायकुळे, अमर गाडे, सोनू नवले यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या