बार्शीत लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील सोलापूर रोड येथे सशस्त्र क्रांतीचे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे युवक मित्र मंडळ, दलित महासंघ, वस्ताद बॉईज यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता एम एन सोनवणे दलित महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अभि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या क्षणाच्या कामाला लहुजी वस्ताद साळवे यांची मोठे पाठबळ होते त्यांच्यामुळेच सावित्रीबाई फुले या देशातील पहिली मुलींची शाळा चालवू शकल्या जगेन तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अशी भीष्मप्रतिज्ञा लहुजी वस्ताद यांनी घेतली होती.
लहुजी वस्ताद यांचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकांनी घ्यावा आपल्या समाजातील मुलं मुली शिक्षित कराव्या असे विचार उप अभियंता एन एम सोनवणे यांनी मांडले. इंग्रज सत्तेला उलटवून लावण्यासाठी समाजातील तरुणांना शारीरिक शिक्षणाचे धडे देऊन त्यांना दांडपट्टा, तलवार चालवणे, भालाफेकने ,कुस्त्या खेळणे आधी युद्ध कला लहुजी वस्ताद यांनी शिकविल्या.
पुण्यातील गंजपेट येथे लहुजी वस्ताद यांनी पहिली तालीम सुरू केली या त्यांच्या तालमीमध्ये अनेक जणांनी प्रशिक्षण घेतले लहुजी यांचे शिष्य होण्यासाठी लहुजी त्यांच्या तालमीतील शिष्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवणे हा माझाजन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शपथ घेतल्याशिवाय त्यांना तालमीत उतरू देत नसत.
सामाजिक समतेची मुहूर्तमेढ लहुजी वस्ताद आणि त्याकाळी रोवली होती असे विचार दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष कपिल पेठे यांनी केले. यावेळी खांडवीचे दलित महासंघाचे नेते रमेश शेंडगे लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष रोहित खंडागळे खंजिनदार आकाश खंडागळे सचिव सुधीर पेठे सदस्य कुणाल फेरे ,सागर खंडागळे ,प्रवीण पेठे, कृष्णा चव्हाण, आनिश शिंदे , किशोर साठे , आकाश कांबळे , सुधीर चांदणे , रवी काटकर ,संतोष काळे, यांनी परिश्रम घेतले.