रातजंन येथील शहीद जवानाच्या वारसांना डाक जीवन विम्याचा 7 लाख 60 हजाराचा धनादेश सुपूर्द

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील रातंजन येथील रहिवाशी व सैन्यदलातील शहीद जवान कै. गोरख चव्हाण यांच्या वारसाला डाक जीवन विमा(पीएलआय) योजनेअंतर्गत भरपाई देण्यात आली आहे. गोरख चव्हाण यांनी कर्तव्यावर असताना पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती त्यांना देशसेवा करत असताना वीरमरण आले होते. त्यांच्या वारसांना 760950/- इतक्या रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली, त्याचा धनादेश नुकताच सोलापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक मुकुंद बडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डाक जीवन विमा योजना ही इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत अतिशय चांगली विमा योजना असून ही जीवन विमा योजना सर्व कर्मचारी, शेतकरी तसेच सर्व व्यापारी वर्गांसाठी अतिशय लाभदायी योजना आहे. या योजनेत कमी हप्त्यात जास्त रक्कम मिळते.
या डाक जीवन विमा योजनेचा संकट काळात खूप मोठा आधार मिळाला असल्याची भावना वीरपत्नी श्रीमती चव्हाण यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सोलापूर उत्तर विभागाचे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल बंगाळे सर ,बार्शी उपविभागाचे प्रमुख राहुल जाधव, बार्शी चे पोस्ट मास्तर अजितकुमार आवारे, जनसंपर्क अधिकारी अमोल भताने यांच्यासह डाक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.