जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना अटक होऊन केवळ पंधरा दिवस झाले असतानाच बार्शी पंचायत समितीतील शाखा अभियंता दोन हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दुपारी 4 च्या दरम्यान झाली.आयुब शेख असे 2 हजाराची लाच घेताना अटक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी बार्शी तालुक्यातील नारेवाडी या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून काम केले होते त्या कामाचे बिल काढण्यासाठी शाखा अभियंता आयुब शेख यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान मंगळवारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बार्शी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली ही आढावा बैठक संपते तोपर्यंत पंचायत समिती कार्यालय आवारात लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाखा अभियंता शेख यांना पकडले आहे.31 ऑक्टोबर रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराचे लाच घेताना अँटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले होते त्यानंतर जिल्हा परिषदेची प्रशासकीय स्तरावर मोठी बदनामी झाली. या प्रकरणा नंतर प्रशासनाचे दबकून कामकाज सुरू होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासह सर्व कार्यालयात लाच देणे व घेणे गुन्हा आहे लाचे संबंधित तक्रार करून देशाचे सुजाण नागरिक व्हा, निशुल्क फोन क्रमांक 1064 संपर्क साधा असे आवाहन पर फलक लावले आहेत . मात्र केवळ पंधरा दिवसातच बार्शीतील पंचायत समितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाले हे विशेष ही कारवाई पोलीस उपाधीक्षक ला प्र वी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक अतुल घाडगे पो शि. उडानशिव यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या