कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन”म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बार्शी अकाऊंट रायटर्स असोसिएशनचे खजिनदार वृक्षमित्र सुनिलजी फल्ले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक दत्तात्रय नवले सर,सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार, सेवानिवृत्त पोस्टमास्तर लतिफ शेख साहेब बाळासाहेब अंकुशे आदी उपस्थित होते.
प्रथमतः डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपले यथोचित विचार व्यक्त केले. यावेळी डॉ.अब्दुल कलाम साहेब यांचे ग्रंथालय उपलब्ध असणाऱ्या विपुल साहित्याची मांडणी सभासद नि वाचक यांचे लक्ष वेधून घेत होती.
*यावेळी श्रीगणेश घोंगडे,सदानंद आगलावे,हनुमंत तुपे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.