जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विवेक बहुऊदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बक्षिस वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे महात्मांगांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विवेक बहुऊदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने 10 ऑक्टोम्बर रोजी सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवर संस्थेचे अध्यक्ष व बहुउद्देशिय कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गुरव गावातील नागरिक बालाजी कवटे, टिपू मुलानी, मुख्याध्यापक हरी ओहळ, सचिन देशमुख थिटे सर, गुंड सर, दीपक डोहिफोडे, शिवाजी घाडगे, विजय सिंह गटकळ सर या सर्व मान्यवर यांच्या हस्ते खालील प्रमाणे बक्षिस वितरण करण्यात आले.
या वेळी विवेक संस्थेच्या वतीने अध्यक्षांनी आपल्या मनोगतांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापक हरी ओहळ सरांनी दत्तात्रय गुरव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. सर्व गुणवंत विध्यर्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये कला विकसित व्हावी यासाठी चित्र कला, रांगोळी आणि निबंध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.
या वेळी रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी निदाने इयत्ता 6 वी, द्वितीय क्रमांक राजनंदनी वैभव मोरे इयता 7 वी, तृतीय क्रमांक संस्कृती शहाजी निकम इयत्ता 5 वी व उत्तेजणार्थ बक्षिस निकिता रामचंद्र मुसळे यांना देण्यात आले.
चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक गौरव मछिंद्र उमाटे 6 वी, द्वितीय क्रमांक बाळू बापू कोळेकर इयत्ता तृतीय क्रमांक रुद्र विलास नवले इयत्ता 5 वी, चित्र रंगवा स्पर्धा प्रथम क्रमांक तृप्ती कैलास ताकपीरे इयत्ता 3 री, द्वितीय क्रमांक नियती मुकुंद ताकपीरे, तृतीय क्रमांक श्रीपाद बाळकृष्ण करळे इयता इयत्ता पहिली, निबंध लेखन इयत्ता पहिली ते पाचवी 1रुद्र विलास नवले इ. 2री सई संतोष करळे इयता 3री जायमाला प्रदीप सुरवसे उत्तेजणार्थ, आर्यन नामदेव मुळे, आदिती विलास मुळे निबंधलेखन इयत्ता 6 वी ते 8 वी 1ली प्रगती नामदेव मुळे 2री राजनंदणी वैभव मोरे उत्तेजणार्थ रोहन दादा ताटे प्राजक्ता अशोक कवठे यांना देण्यात आले.