नाथ प्रतिष्ठान, बार्शी व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना औषध व फराळ वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सालाबादप्रमाणे बार्शी शहर व इतर भागातून हजारो भाविक तुळजापूरला चालत जात असतात, त्यांची सेवा करण्यासाठी नाथ प्रतिष्ठान, बार्शी व नाथपंथी डवरी गोसावी समाज यांचे मार्फत औषध व फराळ वाटप कार्यक्रम बार्शी-तुळजापूर रोड वरील निंबळक फाट्याजवळ भाविकांची सेवा केली.बार्शी ते तुळजापूर रस्त्यावरून पायी चालत हजारो भाविक जात असतात. तुळजापूरला तुळजा भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी कोणत्या ही भाविकांची गैरसोय होऊन अनेक मंडळाच्या वतीने उपक्रम राबवत असतात. नाथ प्रतिष्ठान, बार्शी व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने अनेक वर्षांपासून भाविकांची सेवा करीत आहेत. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य समाजाच्या वतीने करीत असता.
त्यावेळी संजय चव्हाण अध्यक्ष , काशिनाथ गोसावी , नवनाथ गायकवाड , मछिद्र प्रयळकर ,बाळनाथ जाधव, लक्ष्मण जाधव, विकास अंबाड, बालाजी कोथमिरे, प्रमोद मोरे , राजेंद्र चव्हाण इतर मान्यवर उपस्थित होते.