संतोष कुमार चिकणे यांना मुख्याध्यापक संघाचा यावर्षीचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी तालुका बार्शी या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक संतोषकुमार नागनाथ चिकणे सर यांना सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने सन २०२२-२३ यावर्षीचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापूर येथे हुतात्मा सभागृहात झाले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी बाबर साहेब विकास गरड ( शिक्षण उपसंचालक) सुभाष माने ( अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ) सुरेशराव गुंड सर ( क्रीडा सचिव मुख्याध्यापक संघ सोलापूर ) इत्यादी सह इतर मान्यवर उपस्थित होते. संतोष कुमार चिकणे सर यांनी या क्षेत्रामध्ये प्रशालेतील खो-खो स्पर्धेत सलग तीन वर्षे तालुका विजेता तसेच धावणे स्पर्धेत ही मुलांची चमकदार कामगिरी आहे. भरीव कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन्मानपत्र, फेटा शाल व श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ कापसे सचिव अभिजीत कापसे तसेच प्रशालेचे प्राचार्य प्रमोद देशमुख सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन व कौतुक केले. गुळपोळी गावातील सर्व स्तरातून सरांचे कौतुक होत. सरांच्या या यशासाठी, सरांना प्रशालाचे प्राचार्य प्रमोद देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या