बार्शी कुर्डूवाडी लातूर बायपास रोडवर भीषण आपघात एक जण जागीच ठार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी – लातूर बायपास रोडवर दुचाकी व ट्रकचा भिषण अपघात ; अपघातात गुळपोळीतील दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू

बार्शी : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान ताडसौदणे वरून बार्शीकडे प्लॅटिना MH 13 CA 5944 या दुचाकीवर येत असताना, बी आय टी कॉलेज चौकामध्ये रोड क्रॉस करत असताना, कुर्डूवाडी कडून लातूर च्या दिशेने जाणाऱ्या MH 25 U 5779 या ट्रॅकच्या डाव्या बाजूच्या मागील टायर जवळ जोरदार धडक बसली.

रामचंद्र फकीर बचुटे (वय-४५, रा. गुळपोळी, ता. बार्शी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात एवढा भिषण होता कि या अपघातात दुचाकी चालक बचुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र बचुटे हे शेतकरी आहेत. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या ताडसौंदरे या ठीकाणी कामानिमित्त गेले होते. सदर ठिकाणाचे काम उरकून गुळपोळी या ठिकाणी येण्यासाठी निघाले होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने गुळपोळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या