तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांना मोफत चहा , केळी, लाडू औषध वाटप , अशोक प्रतिष्ठान यांचा उपक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे अशोक प्रतिष्ठानच्या वतीने कोजारी पौर्णिमेला पायी चालत जाणाऱ्या लोकांना मोफत चहा ,केळी ,लाडू ,औषध मोफत वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी त्यांचा लाभ घेतला आहे.दर वर्षी पायी जाणाऱ्या लोकांची सेवा केली जाते. अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक नागटिळक म्हणातात लोकांची सेवा ईश्वर सेवा आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना आगळा वेगळा सामाजिक संदेश देतात. वैराग ते तुळजापूर रस्त्यावर हजारो भाविक तुळजापूरला तुळजा भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.त्यावेळी आप्पा नागटिळक , अशोक नागटिळक , बापू नागटिळक , आकाश बनसोडे , भैरवनाथ चौधरी , आप्पा स्वामी , निलेश गिराम , अरविद आतकरे , अर्जुन साठे , गौतम वाघमारे , योगेश इंगळे , श्रीराज हजारे , रितेश नागरगोजे , विक्रांत चव्हाण , अजय बिले , शाहरुख अत्तार शुभम खरसाडे इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या