स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधीनीच्या वतीने सोलापूर येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय तसेच लघुद्योग आणि केक मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी आणि महिला बचत गट आदींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी चा वतीने सद्याची परिस्थिती व या व्यवसायाची वाढती संधी याचा विचार करता सोलापूर येथे दिनांक 15 ते 16ऑक्टोबर 22 या कालावधीत शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाचे तज्ञ मार्गदर्शक सतीश रन्हेर सर परभणी यांचे प्रशिक्षण होणार असून या प्रशिक्षणात शेळी, कोंबडी, गाय म्हैस यांचा जाती व निवड,आहार व गोठा व्यवसथापन, आजार, उपचार, लसीकरण, विक्री, नफा, बँकिंग आणि शासकीय योजना आदी विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यास तिन्ही विषयाचे प्रमाणपत्र,प्रोजेक्ट रिपोर्ट, शेड नकाशा आणि सर्व विषयावरील नोटस प्रशिक्षणामध्ये दिले जाणार आहेत. तसेच दिनांक 17 व 18 ऑक्टोबर 2022 रोजी लघु व गृहउद्योग तसेच केक मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चहा मसाला, फिनाईल, सुगंधी अगरबत्ती, सेंट, लिक्विड डिश वॉश, साधा केक आणि आईस केक यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होईल तसेच कच्चा माल, पॅकिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, लायसन यासह खूप गोष्टी यात शिकायला मिळतील, हे प्रशिक्षण पूर्ण करणारास प्रमाणपत्र व नोट्स मिळतील.
सदर प्रशिक्षण नेहरू युवा केंद्र कार्यालय, कोषागार कार्यालयाच्या मागे, सोलापूर येथे होणार आहे.
तरी याचा जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन प्रबोधिनीचे मुख्याधीकारी निलेश उबाळे यांनी केले आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी 8390463647 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या