आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर, दि. १५ : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा भरत असतात. सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.500दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने ११ लाख बुंदी लाडू प्रसाद व ७५ हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून, राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे.

भाविकांसाठी ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रति पाकीट रु. २० दराने, तसेच २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रति पाकीट रु. १० दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार व श्री संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे सुरू असून ती २४ तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत.500बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.

बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्याकडे सोपविण्यात आली असून, सुमारे ११० कर्मचारी व स्वयंसेवक २४ तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, अशी माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या