शेतकऱ्याच्या मोबदल्यात अस्पष्टता असताना व गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशाला – नगरसेवक कृष्णराज बारबोले

0

कृष्णराज बारबोले यांच्या शक्तीपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : तालुक्यातील गौंडगाव येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक मंगळवारी संपन्न झाली.नगरसेवक कृष्णराज बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक पार पडली.
गरीब शेतकरी भूमिहीन होण्याची परिस्थिती,मोबदल्याबद्दल अस्पष्टता,गरज नसताना राज्य सरकार कडून महामार्गाचा अट्टाहास,सुपीक जमीन बाधित होणे, शेतकरी हितापेक्षा कंत्राटदार हित या सर्व कारणांमुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे.
500यावेळी नगरसेवक कृष्णराज बारबोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत महामार्गाविरोधात ठामपणे असल्याचे व सरकारी मोजणीला विरोध करणार असल्याचे सांगितले. बार्शी तालुक्यातील इतर गावातील महामार्गग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.500या बैठकीचे आयोजन किसान आघाडीचे जिल्हा कार्यसध्यक्ष राहुलराजे भड,बालाजी पैकेकर,सोमनाथ चव्हाण व संजय नाईकवाडी यांनी केले होते. या बैठकीसाठी कृष्णराज बारबोले यांच्यासह रुईचे गावचे शक्तीपीठ विरोधी नेते गणेश घोडके,भारत देशमुख,नरेंद्र नलावडे,बाप्पा सुतार व प्रथमेश गवळी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या