बार्शीमहाराष्ट्र

आंबा फळबाग भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शीसह सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हवामान ,शेत जमिनीचा प्रकार ,पाण्याची उपलब्धता आणि दळणवळणाची व्यवस्था इत्यादी बाबीमुळे भविष्यात आंबा शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास बार्शीतील माजी आमदार आणि कृतिशील शेतकरी राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.5000राजेंद्र राऊत यांची सात वर्षाची दहा एकर आणि तीन वर्षाची तीस एकर अशी एकूण 40 एकर अंबाबाग असून त्यापैकी दहा एकर अंबाबाग 27 लाख रुपयाला व्यापाऱ्याला दिली आहे. यावेळी ते म्हणाले की खत, औषधे ,फवारणी आणि मजुरी सह एकरी 40 ते 50 हजार रुपये आंबा बागेला खर्च केल्यास पाचव्या वर्षापासून एकरी किमान दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न हमखास मिळते .आपल्या वातावरणात केशर आंबा अतिशय चांगल्या दर्जाचा येतो आणि त्याला बाजारभावही चांगला मिळत आहे. आंब्याचे देट मजबूत असल्याने साधारण वाऱ्यापासून त्याचे संरक्षण होते. पांडुरंग फुंडकर योजनेतून आंबा लागवड,ठिबक आणि रोपा सह शेतकऱ्यांना सध्या अनुदान मिळत आहे.500मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने भविष्यात आंबा पिक विमा रक्कम आणि इतर शासकीय योजनाबाबत नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात बार्शी केशर नावाने आंब्याचा ब्रँड तयार करण्यावरही तालुक्यातील सर्व शेतकरी आणि आंबा व्यापारी यांच्या समवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button