जयंतीबार्शीमहाराष्ट्र

गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे : भैरवनाथ चौधरी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : विश्वभूषण , प्रज्ञासूर्य , महामानव , बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर  यांच्या १३५ व्या जयंती  महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते सुनिल चौधरी तर प्रमुख पाहुणे नानासाहेब श्रीमंत शिंदे तर प्रमुख उपस्थिती सचिन चौधरी, समाधान चौधरी होते.

प्रमुख पाहुणे नानासाहेब शिंदे, सुनिल चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे महापुरुषांचे पुस्तक व गुलाब देऊन सत्कार करण्यात आले.

5000कार्यक्रमाचे वेळी संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे, शिका , संघटित , संघर्ष करा आशा संदेश दिला. बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे. आपल्या देशाला सर्वात मोठी राज्यघटना दिली. ते महामानव संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.5000यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी किरण खुरंगळे, सचिन चौधरी, सुमित माळी ,अधिरा चौधरी , दिपाली चौधरी , रंजना खुरंगळे, सुनिल चौधरी, समाधान चौधरी, नाना शिंदे, इतर मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन अभारप्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button