सुयश विद्यालय, बार्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; संस्थापक शिवदासजी नलावडे साहेब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : येथील सुयश विद्यालयामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी शाळेचे संस्थापक शिवदासजी नलावडे साहेब, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम तसेच उपमुख्याध्यापक येवले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकवृंदही या कार्यक्रमात उपस्थित होते.5000या प्रसंगी संस्थापक शिवदासजी नलावडे साहेब यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, समानतेचा संदेश आणि समाजातील परिवर्तनासाठी आंबेडकरांच्या विचारांचे अनुसरण करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांना नवी ऊर्जा व दिशा मिळाली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या