पेन्शन धारकांचे दि 25 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूरच्या कार्यालयावर सोलापूर, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्यांचा येणार दबाव
बार्शी : महाराष्ट्रातील सर्व ईपीएस 1995 योजनेतील सर्व सभासद व पदाधिकारी यांचे ‘एकता संघर्ष कृती समिती’ च्या वतीने गुरुवार दि 25 ऑगस्ट 2022 रोजी देशातील प्रत्येक ईपीएफओ कार्यालय समोर एक दिवशीय धरणा अंदोलन करण्यात येणार आहे. तुटपुंजी व लाजीरवाणी, समाजात पत नसल्या सारखी वागणूक पेन्शन धारकांना दिली जाते. या महागाईच्या काळात सर्वांना जगण्या इतपत पेन्शन वाढ मिळाली पाहिजे व पेन्शन धारकांच्या प्रमुख मागण्या त्वरित पूर्ण केल्या पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मा. पेन्शन आयुक्त यांच्या मार्फत, मा प्रधानमंत्री, मा. अर्थमंत्री व श्रममंत्री यांना राज्यभरातून एकाच दिवशी निवेदन देण्यात येणार आहे.तरी महाराष्ट्रातील 187 उद्योगातील वीज मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, कापड गिरण्या, दुध संघ, अर्बन बॅंक, पत संस्था, हातमाग, बीडी उद्योग, टाटा, किर्लोस्कर, इंजिनियरींग कॉलेज, फुड कार्पोरेशन, वन विभाग व इतर संघटीत क्षेत्रातील सर्व सदस्यांनी या योजनेतील पेन्शनधारकानी आपल्या अस्तित्वचा व स्वाभिमानाचा लढा देण्यासाठी, आपल्या एकतेची वज्रमुठ दाखविण्यासाठी गुरुवारी दि 25 ऑगस्ट 2022 रोजी सोलापूर कार्यालय याठिकाणी होणाऱ्या धरणा अंदोलनामध्ये सोलापूर, उस्मानाबाद व लातूर येथील पेन्शन धारकांनी सहभाग नोंदवून संघटनेची शक्ती दाखवून आपल्या न्याय व हक्कासाठी सहभाग नोंदवावा असे कळकळीचे आवाहन ईपीएस (1995) महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
धरणे आंदोलनामधील या आहेत प्रमुख मागण्या
1) दरमहा रू9000/- महागाई सहीत पेन्शन मिळावी
2)वैद्यकीय सेवा मोफत मिळावी
3) विधवा महिलांना 100% पेन्शन मिळावी
4)पेन्शनधारकांच्या पती पत्नीच्या मृत्यू नंतर त्यांची जमा अनामत रक्कम वारसाना मिळावी
5) ट्रेड युनियनचे हक्क रद्द करू नये
6) ईपीएस (1995) योजनेला कायदा करावा
निवृत्त कर्मचारी(1995)समन्वय समिती(राष्ट्रीय संघटना) नई दिल्ली नागपूर, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, इंजि. शशिकांत ठोकळे – सचिव महाराष्ट्र राज्य