“जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर” यांचे हस्ते होणार “मधुबन ट्रॅक्टर्स” च्या “ग्रीन सिस्टम” दालनचे उदघाट्न

0

सोलापूरकरांसाठी व उस्मानाबादकरांसाठी खुशखबर…!

B1न्यूज मराठी नेटवर्क

शेतीच्या मजूर टंचाईच्या समस्या मधून शेतकऱ्यांशी होणार मुक्तता

बार्शी : २० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या मधुबन नर्सरी व मधुबन ट्रॅक्टर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत ग्रीन सिस्टम हे भव्य अवजारांचे दालन. या भव्य शोरूमचे उद्घाटन दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी स.१० वा. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मधुबन ट्रॅक्टर्स चे चेअरमन प्रवीण कसपटे यांनी दिली.शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत या अडचणीमुळे शेती करणे कठीण झालेला आहे आणि यावर पर्याय म्हणून आता कृषी यांत्रिकीकरण शिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या उपयोगाची सर्व छोटी-मोठी अवजारे आता एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, शहाजी कदम बार्शी तालुका कृषी अधिकारी, अण्णासाहेब मांजरे पोलीस निरीक्षक बार्शी, सुनील शेरखाने मा. तहसीलदार बार्शी, एन.एम.के – वन गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ.नवनाथ कसपटे, मधुबन फार्म अँड नर्सरीचे संचालक रवींद्र कसपटे, राजेश लिंगमपल्ली झोनल बिजनेस मॅनेजर जॉन डीअर इंडिया प्रा.लि., अंकित सक्सेना एरिया मॅनेजर एम.एच.2 जॉन डियर इंडिया प्रा.लि., संदीप अवसरे जनरल मॅनेजर प्रोडक्शन सिस्टम पार्टनरिंग रीजन१, कैलास तासकर असिस्टंट एरिया मॅनेजर जॉन डियर इंडिया प्रा.लि., रवींद्र प्रभू देसाई एम.डी. स्टील इंडिया प्रा.लि., संजय वशिष्ठ नॅशनल सेल्स मॅनेजर स्टील इंडिया प्रा.लि. इ. उपस्थित असणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालक-मालक, शेतकरी मित्र सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन नवनवीन अवजारांची माहिती घ्यावी असे आवाहन मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे यांनी केले आहे.

पत्ता: मधुबन ट्रॅक्टर्स, लातूर रोड, बार्शी.
नंबर: 7057777757

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या