जय शिवराय प्रतिष्ठानच्या मोफत ई-श्रम कार्ड शिबिरामध्ये विक्रमी ८७५ कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी व डाक घर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रमिक, कष्टकरी कामगारांसाठी मोफत ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सोमवार व मंगळवार या दोन दिवशी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ८७५ असंघटित कामगारांना मोफत ई-श्रम कार्ड काढून देण्यात आले. यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानचे तीस सदस्य व बार्शी डाक घरचे पंचवीस कर्मचारी मंगळवारी सुट्टी असताना देखील सोमवार व मंगळवार दोन दिवस अखंडपणे परिश्रम घेत होते. असंघटित व असाक्षर कामगारांना या ई-श्रम कार्ड संदर्भात जनजागृती करून कागदपत्राची माहिती देऊन त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे गोळा करण्यात आली. कागदपत्रे गोळा केल्यानंतर देखील असंख्य कामगारांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसल्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी असंख्य अडचणी येत होत्या यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य सागर माने व सौ. जया नान्नजकर यांनी मोबाईल लिंक नसलेल्या कामगारांचे देखील बायोमेट्रिक पद्धतीने ठसे घेऊन ई-श्रम कार्ड काढून दिले.
यामुळे असंघटित कामगारांची नोंद शासन दरबारी होऊन त्यांना अनेक प्रकारचे अनुदान मिळण्यासाठी ते प्राप्त झाले. त्याचबरोबर ज्या असंघटित कामगारांचे आधार लिंक होते त्या सर्व कामगारांचे अवघ्या काही वेळात पोस्टातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मोफत ई-श्रम कार्ड काढून दिले. या शिबिराचे व्यवस्थापन जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक कामगाराला, कार्डधारकाला मोफत प्रिंट त्याचबरोबर त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्याचं काम जय शिवराय प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले. शिबिराची वेळ सकाळी ९ ते सायं. ६ असताना देखील दोन दिवस हे शिबिर सकाळी ९ ते संध्या.९ एवढा वेळ वाढवून यशस्वी करण्यात आलं. असंख्य कामगारांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
तसेच ई-श्रम कार्ड सोबत पोस्टाच्या अनेक योजना देखील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून झालं. यामध्ये पोस्टातील ३९९ च्या अपघाती विमा देखील ३७ विमाधारकाने काढला. त्याचबरोबर जय शिवराय प्रतिष्ठान गेली वर्षभर राबवत असलेल्या समृद्धी सुकन्या योजनेचा लाभ देखील २३ मुलींना या शिबिरात मिळाला. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक देखील या शिबिरामध्ये साधारपणे तीनशे जणांचे करण्यात आले. हे शिबिर राबवण्या मागचे उद्देशच छत्रपती शिवरायांचे विचार समाजात रुजवून समाजहित, देशहित जोपासणे हे आहे असे संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल वाणी यांच्याकडून सांगण्यात आले.
या शिबिरासाठी बार्शी डाक घरचे राहुल जाधव, रवींद्र बगाडे, अजित नडगिरे, प्राजक्ता महाडिक, गौरी पारडे व इ. तसेच जय शिवराय प्रतिष्ठानचे विजय राऊत, सुमित नाकटिळक, गणेश वाणी, सुहास गुंड, राहुल वडेकर, अविनाश वैद्य, गणेश हांडे, विनीत नागोडे, सूरज वाणी, अमित नागोडे, दीप उपळकर, कृष्णा परबत, निखिल गरड, संकेत वाणी, आकाश तावडे, नागराज सातव, सागर क्षीरसागर, बाबासाहेब बारकुल, मनोज मोरे, दिनेश मुळे, अक्षय अंबुरे, किरण नान्नजकर, माधव जाधव, राहुल वाणी, मिताली गरड, सतिश राऊत, माऊली लोखंडे, गणेश पन्हाळकर, वैभव गात, अनिल शेलार, गणेश रावळ यांनी परिश्रम घेतले. सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून व श्रमिकांना मोफत ई-श्रम कार्ड वाटप करून शिबिराची सांगता करण्यात आली.