माणुसकीचा झरा! पत्रकार भैरवनाथ चौधरी यांची मुक्या प्राण्यांसाठी सलग ३ वर्षांपासून अविरत ‘जलसेवा’

0

सामाजिक बांधलकीचा वारसा: गुळपोळीच्या महामानव संस्थेतर्फे विविध उपक्रमांतून समाजसेवेचा डोंगर!5000

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या की पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. अशा काळात मानवाप्रमाणेच मुक्या प्राण्यांचीही तहान भागवणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून गुळपोळी (ता. बार्शी) येथील पत्रकार भैरवनाथ चौधरी यांनी गेल्या तीन वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्याही ऋतूचा विचार न करता, सलग ३६ महिने त्यांनी परिसरातील गायी, म्हशी, बैल आणि शेळ्या-मेंढरांसाठी स्वच्छ पाण्याचा हौद भरून ठेवण्याची सेवा सुरू ठेवली आहे.5000केवळ पाणीच नाही, तर स्वच्छताही! भैरवनाथ चौधरी हे केवळ हौद भरून थांबत नाहीत, तर दर तीन-चार दिवसांनी हा हौद स्वतः स्वच्छ करतात, जेणेकरून प्राण्यांना शुद्ध पाणी मिळेल. ग्रामीण भागात जिथे अनेकदा पाणीटंचाई भासते, तिथे त्यांची ही ‘जलसेवा’ पशुपालकांसाठी मोठा आधार ठरली आहे.5000महामानव संस्थेचा समाजसेवेचा विस्तार:
भैरवनाथ चौधरी हे ‘महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ माध्यमातून केवळ प्राणीसेवाच नव्हे, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत आहेत.
5000संस्थेमार्फत राबवण्यात आलेले काही प्रमुख उपक्रम :5000आरोग्य व शिक्षण: महिलांसाठी आरोग्य शिबिरे, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत.50000सन्मान व गौरव: आजी-माजी सैनिकांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव आणि आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान.5000

50000जागतिक महिला दिन साजरा – विविध क्षेत्रातील – 8 महिलांना सन्मान – शेतकरी , मजूर , राजकीय , सामाजिक , शिक्षण , व्यवसाय , आदर्श माता , – पुष्पहार शाल नारळ गुलाब – महिला योगदान सामाजिक कार्य जीवन पट – पुस्तक देऊन सन्मान कार्यक्रम ठिकाण – भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी

5000मदत कार्य: अनाथालयांना अन्नधान्य पुरवठा आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदत.500050005000प्रशासकीय जनजागृती: १२५ जणांना मोफत आधार कार्ड काढून देणे आणि पोस्टाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे.50005000इफ्तार पार्टी: गुळपोळी आणि मालवंडी या दोन गावांतील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून समाजात एकोपा जपला. निसर्ग संतुलन आणि सामाजिक बांधलकी जपणाऱ्या या कार्यामुळे भैरवनाथ चौधरी आणि त्यांच्या संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.50005000समाजप्रबोधन उपक्रम भैरवनाथ चौधरी पत्रकार स्वतःच्या लग्न पत्रिकेद्वारे सामाजिक संदेश प्रसार जनजागृती विषय: – जात-पात निर्मूलन ,पाणी बचत – बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, रक्तदान, नेत्रदान – स्वच्छ भारत पर्यावरण संरक्षण महापुरुषांचे फोटो लावून दिला संदेश500“मुक्या प्राण्यांची तहान भागवणे हे परमेश्वर सेवेसारखेच आहे व हीच तर खरी समाजसेवा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
— भैरवनाथ चौधरी, पत्रकार व समाजसेवक
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या