बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शीचा विद्यार्थ्यांसाठी आदर्श उपक्रम — स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांनी उल्लेखनीय कार्य करत स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना – विद्यार्थी-पालक अपघात विमा अंतर्गत राज्यातील पहिला विमा दावा मंजूर करून घेतला आहे. महाविद्यालयाच्या तत्पर पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबाला अल्पावधीत आर्थिक मदत मिळाल्याने सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत आहे.5000चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. इंटिग्रेटेड रिस्क इन्शुरन्स ब्रोकर्स यांनी तयार केलेल्या पॉलिसीनुसार या योजनेच्या राज्यभर अंमलबजावणीसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी, पुणे ऑफिस-३ यांची निवड करण्यात आली आहे.50000अवघ्या ७३ रुपयांमध्ये पाच लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना उपलब्ध करून देणारी ही योजना विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाने तात्काळ पुढाकार घेत फेब्रुवारी २०२६ मध्ये विमा दावा सादर केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नॅशनल इन्शुरन्स कंपनीने अवघ्या सात दिवसांत रु. ४ लाख ४० हजारांचा विमा दावा मंजूर केला.5000नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर राहुल पाटील व डेप्युटी मॅनेजर सौ. अंजू शिंदे यांनी स्वतः महाविद्यालयात भेट देत मयत संजय अनभूले यांच्या कुटुंबीयांना दावा मंजुरी पत्र व टोकन धनादेश प्रदान केला तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना या योजनेचे महत्त्व, अपघात विम्याची गरज व विविध सुरक्षा योजनांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली.

कार्यक्रमास शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय करंडे, प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.50000

सदर विमा दावा मंजूर होण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. विशेषतः कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांची तत्पर पूर्तता करून प्रक्रियेला गती दिली. विद्यार्थ्यांच्या कठीण प्रसंगी महाविद्यालयाने दाखविलेली संवेदनशीलता व जबाबदारीची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विद्यार्थी हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी हे शिक्षणाबरोबरच सामाजिक सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या आधारासाठीही कटिबद्ध असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या