वैराग ते मोहोळ रस्ता संपूर्ण खड्डेमय

B1न्यूज मराठी नेटवर्क : गौतम नागटिळक
वैराग : वैराग ते मोहोळ राज्यमार्ग ७ ४ हा वैराग ते मुंगशी वा पर्यंत संपूर्ण खड्डेमय झाला आहे त्यामुळे या मार्गावर दररोज अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर दुतर्फा गवत झाडी वाढल्याने पाण्याची विल्हेवाट होत नाही तसेच या मार्गावर वैराग हून पुढे राज्य महामार्ग ९ ला मोहोळ येथे हा जोडला आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा कोल्हापूर जाणारे हजारो प्रवासी व देवदर्शना साठी जाणारे वारकरी व भावीक भक्त जवळचा मार्ग म्हणून हा मार्ग निवडतात तसेच या मार्गावर अवजड वाहतूक ही जास्त प्रमाणात आहे. तसेच वाळूज मुंगशी व दहिटणे येथील शेकडो शालेय विद्यार्थी आपला जिव धोक्यात घालून याच मार्गावर प्रवास करीत आहेत.
गेल्या वर्षा पासून वैराग ते मुंगशी वा या रस्त्याकडे प्रशासनाचे ही दुर्लक्ष आहे त्यामुळे प्रशासनावर प्रवासी व वाहन चालक यांच्यात नाराजीचा सुर आहे. हा मार्ग अतिशय धोकादायक बनला आहे यापुढे या रस्त्यावर खड्यामुळे अपघात झाल्यास संबधीत प्रशासन लाच जबाबदार धरून त्वरीत खडडे न बुजविल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे मुंगशी ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
वैराग ते मोहोळ मार्गावरील मुंगशी पर्यंत मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत त्यामुळे दररोज अपघात घडत आहेत मुंगशी येथील दोघे जण या अपघातामुळे गंभीर जखमी आहेत प्रशासनाचे या मार्गाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास तिव्र आंदोलन करून तसेच गांधीगिरी करून १५ ऑगष्ट ला या खड्यात वृक्षारोपन करू
काशीनाथ क्षीरसागर ग्रामस्थ मुंगशी
वैराग ते मुंगशी रस्ता संपूर्ण झाला आहे त्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे वीस मिनिटाच्या प्रवासाला सुमारे एक तास लागत आहे तसेच वैराग बार्शी ही मोठी बाजार पेठ असल्याने मुंगशी दहिटणे येथील शेतकरी माल वाहतूक किराणा माल , दुध वाहतुक, जास्त प्रमाणात आहे त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हावा
विनोद तुपेरे वाहन चालक मुंगशी वा