डहाणू फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन विकासाला गती मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

पालघर दिनांक २० मार्च : डहाणू हा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर असून येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.डहाणू फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
निसर्गरम्य वातावरणात बहरलेल्या डहाणू फेस्टिव्हलचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी आमदार रविंद्र फाटक , आमदार राजेंद्र गावीत, आमदार विनोद निकोले,आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखङ , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, ,डहाणू नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, पालघर नगरपालिकेचे नगराध्यक्ष उत्तम घरत सहा जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री,माजी आमदार सर्वश्री सुनिल भुसारा,अमित घोडा, श्रीनिवास वनगा मनिषा निमकर. राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण ,डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अक्षय गुडदे निलेश सांबरे, कुंदन संखे, आनंदभाई ठाकूर, जगदीश धोडी, मिलिंद पाटील, सुनिल कोळी, , पल्लवी सस्ते, भूपेन बारी, दिपेश बारी तसेच नागरिक उपस्थित होते.50000डहाणूसाठी प्रस्तावित १० बसेसऐवजी आता २५ बसेस देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. तसेच, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसचे अनावरण होणार असून, पुढील सहा महिन्यांत ३,००० बसेस राज्याच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बसेसपैकी काही बसेस डहाणूसाठी देण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.50000पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही सकारात्मक संकेत देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, डहाणूसाठी पर्यटन विभागामार्फत चार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विचाराधीन असून, याशिवाय आणखी पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

डहाणू फेस्टिव्हलच्या आयोजनाचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. “ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे आम्ही अनेक वर्षांपासून फेस्टिव्हल आयोजित करतो, मात्र डहाणूचा हा उपक्रम अधिक प्रेरणादायी आहे,” असे सांगत त्यांनी भविष्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या