‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान

0

अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नांदेड दि. 20 मार्च : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्के म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद आणि माविम यांच्याद्वारे पुरस्कृत महिला बचतगट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.50000या योजनेच्या लाभासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, ते गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रीया ऑनलाईन लॉटरी पध्दतीने केली जाईल, यासंबंधीचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

या कृषी अवजारांची करता येणार खरेदी
निवड झालेल्या गटांना गावस्तरावर अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यासारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.
50000लाभार्थी निवडीची पद्धत: योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. जर प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे आवाहन इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर (https://dbtndksp.mahapocra.gov.in/) वर ५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या