संभाजी घाडगे यांना शिक्षण क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित
Oplus_16908288
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बार्शी यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉ. कुंताताई नारायण जगदाळे जीवन-गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षण, सामाजिक, साहित्य, वैद्यकीय, पत्रकारिता, कृषी, क्रीडा आदी नऊ क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षीचा शिक्षण क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार जिजाऊ गुरुकुल, खांडवीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भारत घाडगे यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन, समर्पित व समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत धुरे तसेच कामगार नेते काँ. तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यापूर्वीही संभाजी घाडगे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार स्वीकारताना संभाजी घाडगे म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना आमच्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे, याचा मला मनापासून अभिमान वाटतो. कोणताही प्रस्ताव न देता हा पुरस्कार देऊन आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे.” कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




