बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत यात्रेचे स्वरूप १४६९ प्रकरणे तडजोडीने निकाली ०३ कोटी ७५ लाख २१ हजार ९१६ रूपयांची वसुली

0

पॅनल क्रमांक 4 मधील पक्षकारास अवॉर्ड सुपूर्त करताना अध्यक्ष श्री व्ही के मांडे साहेब व पॅनल प्रमुख श्रीमती राऊत मॅडम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे सोलापूर एम. एस. शर्मा साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर पी. पी. पेटकर यांचे सहकार्याने, बार्शी तालुका विधी सेवा समिती, बार्शी व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विदयमानाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजीत केलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत २३१ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व १२३८ असे एकुण १४६९ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने मिटवुन त्यात सुमारे प्रलंबीत प्रकरणात अनुक्रमे ३ कोटी २६ लाख ६६ हजार ८२४ व दाखलपुर्व प्रकरणांत ४८ लाख ५५ हजार ९२ रूपयांची वसुली झााली या राष्ट्रीय महालोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७३८ व दाखलपुर्व ४६२४ असे एकुण ८३६२ प्रकरणे लोकअदालत पॅनल मध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

या लोकअदालतीमध्ये बार्शी न्यायालयातील एकुण सात पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे साहेब, जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती व्ही. एस. मलकलपटट्टे- रेडड्री. साो., दिवाणी न्यायाधीश व स्तर पी. बी. लोखंडे साो., सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत साो., २रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती जी. एस. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती एच. यु. यु. पाटील साो., ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण सात पॅनल होते. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ३ मधील दिवाणी न्यायालय व स्तर पी. बी. लोखंडे यांचे न्यायालयातील १० वर्षे जुनी दरखास्त तडजोडीने निकाली काढण्यात आले. तसेच पॅनल क. ६ मधील श्रीमती आर.पी. बागडे यांचेकडील ७८ वर्षीय जेष्ठ महिला पक्षकार यांचा वाटपाचा दावा तडजोडीने निकाली करण्यात आला.

जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण २ प्रकरणे तडजोडीने मिटुन त्यात सुमारे ३२ लाख ५० हजार इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. अॅक्ट १३८ च्या एकुण १७प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे ३२ लाख २८ हजार ५१ रूपयांची वसुली, तर रक्कम वसुलीच्या ४२ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात २ कोटी ५६ लाख ८४ हजार ६६९ रूपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणांत १२ इतकी प्रकरणे व कबुलीची ९२ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ८० हजार ७०० रूपयांची दंड वसुल करण्यात आला. सदर लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला.

राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये यशस्वी करणेकामी बार्शी वकिल संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी, विज वितरण कंपनी यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या