बार्शी शहर पोलिसांची कामगिरी ; हरवलेले ४८ मोबाईल नागरिकांना परत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी शहर पोलीस ठाण्याने तब्बल ४८ हरवलेले मोबाईल शोधून काढत संबंधित नागरिकांना परत केले असून, या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये आहे.

गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रा-वारी तसेच प्रवासादरम्यान नागरिकांचे मोबाईल वारंवार हरवत असल्याची नोंद घेत मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांनी ग्रामीण हद्दीत हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले होते.

या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली पोसई उमाकांत कुंजीर, पोलीस अंमलदार संतोष जाधवर, सचिन देशमुख तसेच सायबर पोलिस ठाण्याचे रतन जाधव यांनी CEIR पोर्टलचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेतला.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या CEIR पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची माहिती अपलोड करून टीमने लातूर, धाराशिव, अहमदनगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणांवरून मोबाईल शोधून काढले.

जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत बार्शी शहर पोलिसांनी एकूण १०९ हरवलेले मोबाईल शोधून काढत २१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यापैकी नव्या तुकड्यातील ४८ मोबाईल परत करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हरवलेल्या मालमत्तेची प्रभावीपणे शोधमोहीम राबवून ती परत करण्याचे कार्य बार्शी पोलिसांनी सातत्याने सुरू ठेवल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या