प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते ‘विधिमंडळ हिवाळी अधिवेशन- २०२५ दूरध्वनी पुस्तिका’ प्रकाशित

0

क्यूआर कोडमुळे डिजिटल पुस्तिका सहज उपलब्ध

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन आज महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर येथे अधिवेशनाकरिता येणाऱ्या राजकीय प्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार व नागरिकांना संबंधित शासकीय यंत्रणेशी सुलभ आणि त्वरित संपर्क साधता यावा, या उद्देशाने ही विस्तृत मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून संबंधितांना ती उपयुक्त ठरेल, असे प्रधान सचिव सिंह यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते या दूरध्वनी पुस्तिकेच्या क्यूआर कोडचेही प्रकाशन करण्यात आले. क्यूआर कोडमुळे संपूर्ण दूरध्वनी पुस्तिका आता डिजिटल स्वरूपात सहजपणे ऑनलाईन उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे पुस्तिका छापाईसाठी लागणाऱ्या शासनाच्या निधीतही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.

पुस्तिकेतील संपर्क माहितीचा तपशील:

अधिवेशनाच्या काळात सुलभ समन्वयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ही दूरध्वनी पुस्तिका दोन भागांत विभागली आहे.

भाग-१ (राजकीय व व्यवस्थेशी संबंधित):

यात प्रामुख्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य, विधानमंडळाचे प्रमुख (अध्यक्ष, सभापती) यांची कार्यालये व निवासस्थाने यांचे संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत. तसेच, विधानभवन, हैदराबाद हाऊस, रवी भवन आणि नाग भवन येथील तात्पुरत्या निवास व कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. यासह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क आणि नागपूर शहर परिसरातील वैद्यकीय सुविधा, पर्यटनस्थळे व परिवहन (रेल्वे, विमान वाहतूक) संबंधी माहितीही उपलब्ध आहे.

भाग-२ (शासकीय कार्यालये):

यात नागपूरमधील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, न्याय व्यवस्था आणि विविध प्रशासकीय विभाग (सार्वजनिक बांधकाम, वित्त, जलसंपदा) व स्थानिक स्वराज्य संस्था (मनपा/एनआयटी) यांच्या कार्यालये व अधिकाऱ्यांचे विस्तृत संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत.

पुस्तिका प्रकाशन सोहळ्याला सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपसचिव अजय भोसले, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, माहिती विभागाचे संचालक (माहिती) (प्रशासन) किशोर गांगुर्डे, नागपूर- अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे व संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, महासंचालक यांचे विशेष कार्य अधिकारी इरशाद बागवान व जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे उपस्थित होते.

या दूरध्वनी पुस्तिका निर्मितीसाठी गडचिरोलीचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, नागपूर माहिती विभागातील सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, माहिती अधिकारी अतुल पांडे तसेच माध्यम समन्वयक अनिल गडेकर आणि शासकीय मुद्रणालयाचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या