गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून विश्वरत्न , क्रांतीसुर्य , महामानव , परमपुज्य , बोधीसत्व , भारतरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार रंजना खुरंगळे , सुभद्रा चौधरी यांच्या हस्ते घालण्यात आला. महामानवाचे विचार घरोघरी पोहचले पाहिजे , आपल्याला चांगली राज्यघटना दिली आहे. जगात सर्वात श्रेष्ठ राज्यघटना देशाला दिली. महामानवाचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार तळागळात पोहचले पाहिजे, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा आशा संदेश दिला. उपाशी राहून समाजासाठी झठले. डॉ. बाबासाहेबांनी सर्व घटकासाठी कार्य केले, महिलांसाठी कार्य केले. गुलामाला गुलामगिरीची जाणिव करुण दिली. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त बोलत होते. यावेळी किरण खुरंगळे , रंजना खुरंगळे, सुभद्रा चौधरी , भैरवनाथ चौधरी , संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.




