वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी भोजनदान वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुयायांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलेल्या अनियायींसाठी विविध सोयीसुविधांसाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने भोजनदान, पाणीपुरवठा, तसेच अनुयायांना भेडसावणाऱ्या तातडीच्या अडचणी दूर करण्याचे काम हाती घेतले आहे. महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रिय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले.




