बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून ज्येष्ठ नागरिकाला घरपोच मोटरसायकल परत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मुद्देमाल निर्गतीची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान कसबा पेठ, बार्शी येथील रहिवासी जगन्नाथ बापूराव सरवदे (वय 75) यांची मोसा क्र. MH 13 BE 0886 ही मोटरसायकल बेवारस अवस्थेत मिळून आली होती.

पोलीसांनी संपर्क साधला असता, सरवदे यांनी वयपरत्वे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलीस अंमलदारांच्या मार्फत मोटरसायकल घरपोच त्यांच्या ताब्यात देण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया त्यांच्या घरी जाऊन पूर्ण करण्यात आली.

यामुळे 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरज भासली नाही. या संवेदनशील आणि नागरिकाभिमुख कृतीबद्दल जगन्नाथ सरवदे यांनी बार्शी पोलीसांचे मनःपूर्वक आभार मानले.

ही कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अंमलदार सचिन कदम, प्रवीण शहाणे, शरद साळवे यांनी संयुक्तपणे पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या