थोर समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा यांचे दुःखद निधन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आपलं घर प्रकल्प, नळदुर्ग चे संस्थापक, राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालालजी सुराणा (वय 93) यांचे काल रात्री सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दुःखद निधन झाले. काल सायंकाळी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणण्यात आले तेथेच त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे मागे पुत्र प्रभास व कन्या आरती बरीदे आहेत.
मरणोत्तर त्यांनी देहदान केले असून आज दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. प्रार्थना सभा आज दुपारी 3.30 वाजता जैन स्थानक, सोमवार पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे.
श्री भगवंत त्यांचे आत्म्यास सद्गती देवो.




