चाईल्ड हेल्पलाईनमुळे अल्पवयीन बालविवाह रोखला
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर दि. 2 : चाईल्ड हेल्पलाईन 109 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसार 2 डिसेंबर रोजी अल्पवयीन बालिका वय 17 वर्षे 1 माहिने रा. विक्रमनगर, ता.करवीर, जि. कोल्हापूर हिचा बाल विवाह किरण सावळू बागडी, मु.पो. दडडी मुदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव वय 25 वर्षे याच्या सोबत सायंकाळी 5 वाजता त्र्यंबोली हॉल, विक्रमनगर येथे बाल विवाह होणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुसार निवेदिता महाडिक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील महेंद्र कांबळे, अभिजित पाटील, अंगणवाडी सेविका गायत्री कुराडे व वैशाली कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. बालिकेच्या जन्म दाखल्याच्या नोंदणीनुसार वयाची शहानिशा करुन बाल विवाह रोखण्यात आला.
अल्पवयीन बालिका बाल कल्याण समिती समोर सादर करून बालिकेस बालगृहात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एस.एस. वाईगडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीम. अश्विनी खाडे व श्रीम. पद्मजा गारे सदस्या, बाल कल्याण समिती, एस. एन. दाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.




