बार्शीत वकील संघाच्या वतीने संविधान दिन साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय राज्यघटनेचा अवलंब झाल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतो. संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून, प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारे मार्गदर्शक तत्त्व आहे.
या निमित्ताने बार्शी वकील संघाच्या वतीने आज बार्शी न्यायालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामुदायिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रणजित गुंड, लायब्ररी चेअरमन अॅड. अमोल अलाट, अॅड. शैलजा क्षीरसागर, अॅड. महेश जगताप, अॅड. किशोर करडे, अॅड. गणेश फावडे, अॅड. धीरज कांबळे, अॅड. जगदीश साखरे, अॅड. शामकुमार झालटे, अॅड. काका कोरके, अॅड. अभिजीत जगताप, अॅड. चेतन ढाळे, अॅड. कोकाटे, अॅड. मेघराज आडके, अॅड. चंदनशिवे आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.




