महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाच्या उपक्रमांतर्गत शेतमाल खरेदीस सुरूवात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी कडधान्य खरेदीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता ३० ऑक्टोबर २०२५ पासून नोंदणी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मूग ८,७६८/- रूपये प्रति क्विंटल, उडीद ७८००/- रूपये प्रति क्विंटल, सोयाबीन ५३२८/- रूपये प्रति क्विंटल असे केंद्र शासनाने आधारभूत दर निश्चित केले आहेत.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन केंद्रीय नोडल एजन्सींची जिल्हानिहाय खरेदी केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. नाफेड – अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा,वर्धा, वाशिम, संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ,भंडारा, गडचिरोली. NCCF – नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर,नागपूर.

सोलापूर जिल्ह्याकरीता सोयबाीन, उडीद व मूग खरेदी केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.
बार्शी – बार्शी कृ.उ.बा.स – तुळजाभवानी कृषी साधन व पुरवठा सहकारी संस्था मर्या, उंबरगे
मंगळवेढा – मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि, मंगळवेढा
पंढरपूर – पंढरपूर कृ.उ.बा.स – पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि, पंढरपूर
माळशिरस – अकलुज – शेकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि, अकलुज.
अक्कलकोट – अक्कलकोट कृ.उ.बा.स – वि.का. सेवा सहकारी सोसायटी मर्या. किणी
करमाळा – कृ.उ.बा.स – विठ्ठल सर्वसाधरण सहकारी संस्था मर्या, मांगी
कुडुवाडी – कृ.उ.बा.स – माढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. माढा

सदर योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड/NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाईन पध्दतीने PoS मशिद्वारे करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बैंक पासबुक, चालु वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच खरेदीकरीता आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील तसेच संचालक मंडळ यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या