हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांच्या लाभासाठी अर्ज करा
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर, दि. ४ – हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची उपसंस्था) यांच्यामार्फत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अंतर्गत विशेष घटक योजना आणि बीजभांडवल योजना प्रत्येकी ११ कर्जप्रकरणांसाठी, थेट कर्ज योजना चार प्रकरणांसाठी तर एनएसएफडीसी योजना १४ कर्जप्रकरणांसाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसायाचे कोटेशन, वीज बिल, कर पावती, भाडेकरारपत्र किंवा उतारा, व्यवसायाचा न हरकत दाखला, शाळेचा दाखला आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर–मनमाड रस्ता, अहिल्यानगर येथील महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.




