नेटवर्क मार्केटिंग मधील वाढत्या फसवणूक प्रकाराबाबत जन जागृती करणाऱ्या पत्रकार बालाजी शिंदे यांना दमदाटी धक्का बुक्की शिवीगाळ प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगोला : नेटवर्क मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंगच्या फसवणूकीच्या प्रकाराबाबत जनजागृती करणाऱ्या पत्रकार बालाजी शिंदे यांना दमदाटी शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी 1)जगदीश भोसले महूद, 2)बापु फाटे गार्डी, 3)रमेश धनवडे महूद,4) संतोष लोखंडे महिम यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम क्रमांक 323, 504, 506, 34 नुसार सांगोला पोलीस ठाण्यामध्ये एनसीआर (NCR no. 0021/2022)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पत्रकार बालाजी बाबा शिंदे (वय 27 वर्षे धंदा सलून व्यवसाय, रा. कटफळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर )यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जगदीश भोसले रा. महुद, बापु फाटे रा.गार्डी,रमेश धनवडे रा. महुद
संतोष लोखंडे रा. महिम. गुन्ह्यात घडलेली तारीख वेळ ठिकाण दिनांक 3/1/2022 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पत्रकार बालाजी शिंदे आपल्या गावातील सलून दुकानात काम करत असताना हकीकत अशी की पत्रकार बालाजी शिंदे यांनी नेटवर्क मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंग बाबतच्या वाढत्या फसवणुकीबाबतची पोस्ट फेसबुक व व्हाट्सअप वर सर्वत्र व्हायरल केली होती. पत्रकार बालाजी शिंदे यांनी नेटवर्क मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंग बाबत टाकलेल्या जनजागृती बाबतच्या पोस्टचा वरील चारही आरोपी आणि ते चौघे सध्या काम करत असलेल्या कंपनी यांचा काहीही संबंध नसताना चौघांनी सलुन दुकानात येऊन धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केली आहे. म्हणून फिर्यादी पत्रकार बालाजी शिंदे यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये NCR गुन्हा रजिस्ट्री दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल झोळ साहेब हे करित आहेत.
यावेळी फिर्यादी पत्रकार बालाजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्या येत आहेत जात आहेत मागील दहा वर्षाचा सर्वे केल्यानंतर हे लक्षात आले आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कंपन्या जास्त फॉर्ममध्ये येऊन काम करतात. लिडर लोक उत्स्फूर्तपणे काम करतात. परंतु कंपनी कालांतराने डबघाईस आल्यानंतर तेच लिडर लोक त्या कंपनीचे लेबल बदलून दुसऱ्या कंपनीचे नाव देऊन ती कंपनी पुन्हा तेच लीडर लोक चालवत असुन युवकांना,सर्व सामान्य जनतेला या जाळ्यात अडकवून आपली पोळी भाजत असतात. युवकांनी अशा गोष्टींपासून सावधानता बाळगून आपल्या उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे. अशा भूलथापांना बळी न पडता करियर कडे लक्ष द्यावे. अनेक लोक युवकांना लखपती आणि करोडपती होण्याचे आमिष आणि स्वप्ने दाखवत आहेत. बरयाच युवकांचे नेटवर्क मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंगमुळे करिअर बरबाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.