“उद्योजक घडवणं ही फक्त्त चळवळ नाही, प्रेरणा देण्याची प्रक्रिया आहे” – बार्टीचे महासंचालक सुनील वारे
‘आर्टी’ तर्फ ‘अभियंता-उद्योजक कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : उद्योजक बनवणं ही काही फक्त्त चळवळ नसून त्यासाठी प्रेरणा द्यावी लागते आणि ती प्रेरणा अशा कार्यशाळांमधून मिळते. त्यामुळे अभियंता-उद्योजक कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. पिंपरी-चिंचवड येथील नोव्हेल संस्थेत मातंग समाजाची अभियंता कार्यशाळा घेण्यात आली होती, त्याचाच पुढील टप्पा म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, दरवर्षी याचे आयोजन केले जाणार आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक तथा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले.
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) आणि सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सीओईपी सभागृहात शनिवारी (दि. २०) ‘अभियंता-उद्योजक कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक डॉ. प्रकाश धोका, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ (एमसीईडी) चे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, दत्तनाथ इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुरलीधर झोंबाडे, उद्योजक अनिल सौंदाडे, राजेंद्र साळवे, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप देशमुख, आमदार अमित गोरखे, माजी आयुक्त मधुकर गायकवाड, राजेंद्र दणके, आनंद कांबळे, पुंडलीक थोटवे, प्रा. डॉ. योगेश साठे, संतोष अवचरे आदी मान्यवर उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ संशोधक डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेत उद्योग उभारणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रवासावर मार्गदर्शन करण्यात आले.
मातंग समाजातील अभियंते व नवउद्योजकांनी या वेळी परिचय करून देत विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना मातंग बिझनेस असोसिएशनच्या तज्ज्ञ उद्योजकांनी उत्तरे देत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
मान्यवरांचे स्वागत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. निबंधक इंदिरा अस्वार यांनी प्रास्ताविक तर महासंचालक सुनील वारे यांनी आभारप्रदर्शन केले.
उद्योगरत्न पुरस्कार प्रदान स्वतःच्या कष्टाने उद्योग उभारून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योजकांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. उद्योजक आनंद कांबळे, अनिल व निलेश सौंदाडे बंधू, निर्मला ग्लोबल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र साळवे, संतोष कवळे, ग्लोबॅक एपीसी प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष महेंद्र तुपसुंदर, उद्योजक प्रदीप देशमुख, स्पाईस इव्हेंट्सचे संस्थापक प्रसाद कांबळे, ए. एस. सर्व्हिसेस कंपनीचे स्थापक अध्यक्ष सतिष कसबे, पुणेरी गोल्ड आटा कंपनीचे संस्थापक विनायक मोहिते, विजय गायकवाड, उद्योजिका डॉ. भक्ती वारे, अश्विनी गोठे, क्रांतीचंद्र भावे, लोकटाईम्स मिडिया हाऊसचे स्थापक राजेंद्र दणके यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.




