तर शेतकरी रस्त्यावर उतरतील… शंकर गायकवाड
छायाचित्र विविध मागण्यांचे निवेदन देताना शंकर गायकवाड व शेतकरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे आपत्ती निवारण कायद्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या, वगळलेले तिन्ही ट्रिगर घेऊन शेतकऱ्यांना चालू व मागील थकलेला पिक विमा देऊन विमाकंपन्यांची त्यांचे स्थापनेपासून न्यायालयीन चौकशी करा, वगळलेली मंडळे तात्काळ घ्या, शेतकरी आंदोलनातील गुन्हे काढून घ्या इत्यादी मागण्यांसाठी आज रोजी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बार्शीचे नायब तशिलदार संजीवन मुंडे यांचे मार्फत निवेदन पाठवले.
त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सचिन आगलावे, योगेश यादव, राजेंद्र सुर्वे, गणेश यादव, माणिक गरदडे, हनुमंत यादव, समाधान यादव आदींसह शेतकरी उपस्थित होते. मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाची आंदोलने करतील असा इशाराही यावेळी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.




