भैरवनाथ विद्यालय गुळपोळी प्रशालेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2024 25 चा पुरस्कार भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी तालुका बार्शी या प्रशाला मिळाला.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड सभागृह मोहोळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सुभाषराव माने (मुख्याध्यापक संघ नियंत्रक समिती अध्यक्ष) . गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक पुणे), तानाजी माने (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ) बापूं नीळ , सुरेश गुंड, विकास शिंदे , राजकुमार पुजारी , किशोर पाटील , जोत्सना डोके मॅडम , भिमराव व्यवहारे , सुभाष भिमणवरू , शिवपुत्र कोळी , यांचे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशालेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशालेला जिल्हास्तरीयआदर्श शाळा हा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रमोद (पप्पू) देशमुख, ज्येष्ठ शिक्षक संतोष कुमार चिकणे यांचे सह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ कापसे यांनी विशेष अभिनंदन केले.




