सोलापूर लाचलुचपत विभागाचा कायमस्वरूपी व्हॉट्सअँप नंबर जाहीर,.भ्रष्टाचाराविरोधात – ९४०४००१०६४ या नंबरवर करा थेट तक्रार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : नागरिकांना शासकीय कार्यालये, विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून लाच मागितली जाण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा प्रकरणांवर त्वरित कारवाई व्हावी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विभागाकडून नागरिकांना लाच मागणीविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कायमस्वरूपी व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक ९४०४००१०६४ जारी करण्यात आला आहे.या क्रमांकावर नागरिकांना आपली तक्रार लेखी स्वरूपात, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावे जोडून पाठविता येतील. यामुळे तक्रारीची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई करता येणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि घटनेची सविस्तर माहिती द्यावी. सर्व तक्रारींवर गोपनीयतेने कारवाई करण्यात येणार असून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी हमी विभागाकडून देण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कडून नागरीकांना जाहीर आवाहन करणेत येते की, राज्य सरकारचे अधिकारी, शासन अनुदानीत मंडळे / संस्था यांचे अधिकारी / कर्मचारी, महापालीका / नगरपालीका /जिल्हापरिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इत्यादी लोकसेवकांचे भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास अगर लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रारी पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, रंगभवन चौक सोलापूर येथील फोन नंबर, टोल फ्री क्रमांक व तसेच नवीन जारी करण्यात आलेल्या वॉट्सअप मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी.

1) फोन नंबर– ०२१७-२३१२६६८
२) टोल फ्री क्रमांक—१०६४
३) नवीन व्हॉट्सअॅप नंबर —९४०४००१०६४

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या