शेतकरी व तरुण उद्योजकांसाठी कृषी ड्रोन फवारणी कार्यशाळेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मराठा सेवा संघाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ बार्शी संचलित पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद बार्शी यांच्या वतीने शेतकरी व तरुण उद्योजकांसाठी कृषी ड्रोन फवारणी कार्य शाळेचे आयोजन दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता ऍग्रोपार्क नर्सरी तुळजापूर रोड बार्शी या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
सदरची कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी मोफत असून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी ९०७५२९३३३१ या नंबर वर फोन करून नाव नोंदणी करावी असे आवाहन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद बार्शी तालुका अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे.




