मेघा राजू कसबे व ओम राजू कसबे यांनी NEET परिक्षेत यश संपादन केल्या बद्दल भीमनगर मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मेहनतीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही एक प्रेरणादायी बाब असते. अशाच एका प्रेरणादायी घटनेनिमित्त, बार्शीतील भीमनगर येथे NEET परीक्षेत यश संपादन करून MBBS मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या मेघा राजू कसबे व ओम राजू कसबे या भावंडांचा भीमनगर मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राजू सुरेश कसबे (शाखाधिकारी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा अंकोली) व सारिका राजू कसबे यांचे आजोळ बार्शीतील भीमनगर येथे आहे. त्यांच्या मुलांनी NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षेत घवघवीत यश मिळवले. हे यश संपूर्ण भीमनगर परिसरासाठी अभिमानास्पद आहे.
सत्कार कार्यक्रमाच्या वेळी संतोष बोकेफोडे, मक्रोज बोकेफोडे, सनी गायकवाड ॲड. प्रसन्नजित नाईकनवरे, रुपेश बंगाळे, बळीराम बोकेफोडे, तसेच धम्म प्रचारक महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.




