बार्शीत नवीन मतदार नाव नोंदणी शिबीरात 441 जणांची नोंदणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

उद्योजक महेश यादव यांच्या वाढदिनी घेतला उपक्रम

बार्शी : शिवसेना बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक व श्री गणेश वस्त्र दालनांचे मालक महेश यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत नवीन मतदार नाव नोंदणी शिबीर रोडगा रस्ता येथील मानाचा सतरावा पुट्टा गणपती मंदिर येथे मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायं 7 यावेळेत घेण्यात आले.या शिबीरात 18 वर्ष पूर्ण झालेल्या सुमारे 441 नवीन मतदारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते श्रीं गणेशाची आरती करुन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य श्रीमंत थोरात, बाळासाहेब आडके,नगरसेवक पिंटू माळगे, आण्णासाहेब वायचळ, बाजीराव भोसले ,अमोल वायचळ,अमोल हिंगमिरे, रामभाऊ घोंगडे, रामानंद डोंबे, प्रवीणकुमार गाढवे उपस्थित होते.
शिबीर यशस्वीतेसाठी राजाभाऊ पैकीकर, विनोद उमाटे,अमोल वायचळ, विरेंद्र शिराळ, मयूर डोईफोडे, आदित्य कोरे, संजय मंडगे, समर्थ बोटे,नागेश खळदे, श्रीकांत सुपेकर, धनंजय लिगाडे, योगेश कारंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या