जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : दि. १९ : राज्यातील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक बांधकामे वेळेत पूर्ण करून जनतेला दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सतत प्रयत्नशील असून, ही कामे दर्जेदार आणि नागरिकांना उपयोगी ठरणारी असावीत, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

पनवेल येथील रा.मा. १०३ कि.मी. ३/८०० चिपळे येथे नेरे-मालढुंगे नवीन पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य अभियंता सा.बा.विभाग कोकण, सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग पनवेल, संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मंत्री भोसले म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी सर्व कामे ही दर्जेदार असली पाहिजेत.जनतेसह वाहनचालक व प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविल्या पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या चौफेर विकासासाठी बांधकाम विभागाने नियोजनबद्ध कामे हाती घेत आहे. सर्व प्रकारची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आणि त्यात गुणवत्ता राखणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नेरे – मालढुंगे नवीन पूल सुरू झाल्यामुळे नेरे आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांसाठी वाहतुकीची मोठी सुविधा निर्माण झाली असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासालाही या पुलामुळे चालना मिळेल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या