मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 55,555 हजार वह्यांचे अनावरण, सीएम रिलीफ फंडला आमदार देवेंद्र कोठेंकडून पाच लाख, पंचावन्न हजार, पाचशे पंचावन्न रुपयांची मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे 5,55,555 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत.
आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 54 हजार वह्यांचे वाटप केले होते. यंदा 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 55,555 वह्या वाटप करण्याचे नियोजन केले असून या वह्यांचे अनावरण दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या अनावरणप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख, पंचावन्न हजार, पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.




