ऑनलाईन चक्री गेम प्रकरणातील बार्शीतील एकास जामीन मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील व विशेषतः माढा ,बार्शी , कुर्डुवाडी येथील बहुचर्चित ऑनलाईन चक्री गेम गुन्हा प्रकरणात यातील आरोपी नामे योगेश सुरेश गाडे याचा जामीन मंजूर झाला. यात अधिक माहिती अशी की, माढा येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब पी. जी. लबे साहेब यांनी दिनांक.08/07/2025 रोजी आरोपी नामे योगेश सुरेश गाडे याचा जामीन मंजूर केला आहे.
ऑनलाइन चक्री गेम प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक झाल्या बद्दल कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथे गु र नंबर 56 /2025 अन्वये आरोपी नामे नितीन पाटमस ,रणजीत सुतार, वैभव सुतार व इत्यादी आरोपींविरोधात भादवि कलम 420 ,465 ,467 ,468 ,471 ,120 बी व कलम 34 ,तसेच लॉटरी रेगुलेशन ॲक्ट कलम, 7,8,9, महाराष्ट्र गेम्बलिंग ऍक्ट कलम 4, 5 व आय.टी.ॲक्ट 66 डी प्रमाणे ऑनलाईन गेम प्रकरणात कोट्यावधींचे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
त्या अनुषंगाने सदर प्रकरणात वरील आरोपीं शिवाय इतरही आरोपींचा समावेश करण्यात आला सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली. यातील आरोपी नामे सुरेश गाडे याने वकिलांमार्फत मे .न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन माढा येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी . जी.लंबे साहेब यांनी दिनांक 08/07/2025 रोजी आरोपी योगेश सुरेश गाडे याचा जामीन अर्ज मंजूर केला. सदर जामीन प्रकरणी आरोपीतर्फे ॲड सचिन झालटे पाटील , ॲड.शिवराज भोसले, ॲड.अमोल अलाट यांनी कामकाज पाहिले.




