शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेची माहिती मुदतीत सादर करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. १६: शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा-२०२५ च्या अनुषंगाने उमेदवारांनी त्याच संधीत परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत गुणपत्रक अथवा अन्य वैध प्रमाणपत्र एक महिना कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत माहिती सादर न केलेल्या उमेदवारांनी तत्काळ माहिती सादर करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला ईमेल, पोस्ट अथवा हस्तपोच सादर करताना ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा- २०२५’ परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर माहिती भरुन विहित मुदतीत सादर करावी. माहिती विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.




